नागरिकांना वाळू डेपोमधून प्रती ब्रास 600 रुपये दराने वाळू मिळण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

जालना/प्रतिनिधी,दि.14
शासन निर्देशानूसार नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास रेती मिळण्यासाठी नागरिकांनी मागणी ऑनलाईन नोंदविणे बंधनकारक आहे. ऑनलाईन मागणी नोंदविण्यासाठी mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन बुकिंग ऑप्शन मधुन आपली मागणी नोंदवावी किंवा आपल्या गावातील लगतच्या सेतू अथवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन रेतीची मागणी नोंदवावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना वाळू उपलब्ध करुन देणे व अनधिकृत उत्खनास आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत रेती उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याबाबत नवीन धोरण शासननिर्णयाद्वारे जाहीर केले आहे. या नवीन धोरणानूसार जालना जिल्ह्यातील एकुण 2 रेती डेपोच्या माध्यमातुन नागरिकांना 600 रुपये दराने वाळू उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सायगाव-डोंगरगाव ता. बदनापूर येथील एकुण रेती 56 हजार 249 मे.टन म्हणजेच एकुण रेती 12 हजार 472 ब्रास, सावरखेडा ता. जाफ्राबाद येथील एकुण रेती 54 हजार 473 मे. टन म्हणजेच एकुण रेती 12 हजार 78 ब्रास या प्रमाणात उपलब्ध आहे. सेतू केंद्रामध्ये मागणी नोंदविण्यासाठी प्रती व्यक्ती 25 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मागणी नोंदविण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व मोबाईल नंबर देणे बंधनकारक आहे. एका कुटुंबास एकावेळी जास्तीत जास्त 50 मे. टन अंदाजे 10 ब्रास अनुज्ञेय राहील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले