pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सहकार बँक कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा शुक्रवारपासून!

0 3 2 1 8 5
जालना/प्रतिनिधी, दि.9
जालना : येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा व विजय ग्रंथ पारायण सोहळ्यास येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.
यां सप्ताहात शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी रोजी हभप भगवान महाराज सावंत तर शनिवार दि.15 फेब्रुवारी दिनेश महाराज उंडे (देवाची आळंदी), रविवार दि. 16 फेब्रुवारी रोजी हभप सोनवणे महाराज गुरुजी, सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी राजेद्र महाराज वाघमारे आणि  मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी हभप श्रीहरी रसाळ महाराज तर बुधवार दि. 19 फेब्रुवारी रोजी हभप प्रा. उध्दव महाराज राऊत (आळंदी), गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी हभप त्रिंबक महाराज दस्तापुरकर यांचे हरिकिर्तन होणार असून शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी रोजी ंंहभप डॉ. भगवान बाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर याच दिवशी तत्पूर्वी श्री. गजानन महाराज पालखी मिरवणूक (दिंडी) सोहळा होणार आहे.
यानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार असून दररोज सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, श्री. गजानन विजय ग्रंथ पारायण, त्यानंतर गाथा भजन तर दुपारी 1 ते 5 यावेळेत श्री. भागवत कथा होणार आहे. तर सायंकाळी हरिपाठ व रात्री 9 ते 11 यावेळेत हरिकिर्तन व त्यानंतर हरीजागर होणार आहे. तत्पूर्वी भागवत पुजन व समाप्ती महाआरती सौ. व श्री. सिमा शामराव भांदरगे यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रगट दिनाचा महाप्रसादाचे मुख्य यजमान सौ. व श्री. सरिता दत्तात्रय शेजुळ  हे राहणार असून भजनी मंडळ आणि किर्तन सेवेस साथ देणार आहेत मृदंगाचार्य हभप भगवान म. जाधव व तुकाराम म. मुढे, गायनाचार्य हभप हभप विष्णू म. सावंत हे ज्ञानेश्वर म. जोशी, भगवान म. लकडे, गिरी महाराज, रमेश प. पवार, यादव म. जाधव, उध्दव म. राठोड तर हरिपाठाचे नेतृत्व हभप विष्णू म. सावंत हे करणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. सपंतराव पाटील व समस्त विश्वस्तांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे