रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी निबंध स्पर्धां संपन्न
जालना/प्रतिनिधी,दि.21
नेहरू युवा केंद्र व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सरस्वती भुवन प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत निबंध स्पर्धेचे दि. 21 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
निबंध स्पर्धेत “माझे वाहन माझी जबाबदारी”, “रस्त्यावरील अपघात: कारणे व दुष्परिणाम”, आणि “विज्ञान/वाहन: शाप की वरदान” या विषयांवर विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रद्धा साळवे, द्वितीय क्रमांक दिव्या मानकापे, तर धनश्री अकोले यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक राजकुमार मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीमा लखमल, जे. पी. कुलकर्णी, आणि हेमंत जोशी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-