प्रतिभा माध्यमिक विद्यालयात पोक्सो(POCSO)कायद्याअंतर्गत कार्यशाळा

काजळा/भगवान धनगे,दि.31
बदनापूर: बदनापूर तालुक्यातील काजळा येथे आज (दि.31) रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय जालना अंतर्गत पोक्सो कायदा(POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे.
भारतीय संविधानातील अनुच्छेद १५(३) मध्ये इतर गोष्टींबरोबर बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याकरिता राज्य सरकारला अधिकार दिलेले आहेत.ह्या कायद्यामध्ये बालकांचे (मुली/मुले) लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्याकरिता तसेच अपराध्यास कठोर शासन करण्याकरिता तरतूद आहे. बालकांचे लैंगिक छळणूक, छेडछाड, अश्लीलता, कुकर्म, अत्याचार, बलात्कार, ह्या गोष्टींपासून संरक्षण व्हावे, ह्या उद्देशाने हा विशेष कायदा अस्तित्वात आला.या कायद्याची माहिती विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीना व्हावी याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.याविषयी अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहूळे एस जी यांनी शाळेतील मुलां-मुलींना बाल लैंगिक अत्याचार कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अध्यक्षस्थानी होते .बाल लैंगिक संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आलेल्या मान्यवरांचे शाळेतील सहशिक्षक भगवान धनगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गुजर एस.एस.यांचा सन्मान सहशिक्षक मिलिंद उनवणे यांनी केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण कुऱ्हाडे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील पाटील यांनी केले. शेवटी वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.