” वास्तव “हा वात्सववादाचा आनंद देणारा कवितासंग्रह ! – प्रा.एल.बी.पाटील..

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
पनवेल येथील के.गो.लिमये विद्यालयात रायगडचे सुप्रसिद्ध कवी के.पी.पाटील यांच्या “वास्तव” या कविता संग्रहाचे प्रकाशन ७८ व्या प्रजासत्ताक दिनी रोहिदास पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते उरणचे सुपुत्र साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल. बी.पाटील होते .ते आपल्या भाषणात म्हणाले की,” वास्तव “हा कविता संग्रहातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वास्तवतेचे
सुव्यवस्थेतीत माहिती देणारा आणि समाधान देणारा कवितासंग्रह आहे,असे मत व्यक्त
केले.के.पी.पाटील यांनी आपल्या
मनोगतात जीवनाचे वास्तव स्पष्ट केले.
अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी
परिस्थितीचे वास्तव देणारा कवी म्हणून कौतुक करून त्यांच्या सर्वच रचना प्रामाणिकपणे बिनधास्त मांडल्या आहेत,त्या वाचून आनंद झाला आहे.यावेळी पोलीस अधिकारी बी.आर.पाटील, मिलिंद जोशी, प्राचार्य बी.एस.माळी यांनी “वास्तव” चे भरभरून कौतुक केले.यावेळी सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश पाटील,राजेंद्र पालवे,आर.के.म्हात्रे यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.पाटील मॅडम यांनी आभार मानले.