श्री बालाजी मंदिर सिडको नांदेड येथे भगवान ब्रम्होत्सव निमित्त भागवत कथा होम,हवन कार्यक्रमाला भाविक तल्लीन

नांदेड/ चंपतराव डाकोरे पाटिल,दि.10
सिडको नांदेड येथे श्री भगवान ब्रम्होत्सव ऊत्सावानिमित्य अनेक कार्यक्रमांचे आयोजन दि.८ जुनं ते १६ जुनं २०२४ पर्यंत हभप अनिल महाराज यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सुरूवात झाली त्यात अनेक भाविक भक्तीमय तल्लीन झाले
दि.१२ जुनं ते १६ जुनं पर्यंत आचार्य पंडीत सतिष गुरू सिडको व बालाजी मंदिर सिडकोचे पुजारीदिव्याशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने विधीपूर्वक पुजा सकाळी अभिषेक,होम हवन,होत आहे.
दि.१४ जुनं रोजी १०८ कलशाअभिषेकव सकाळी ११ वाजता कल्याण ऊत्सव व श्री भगवान बालाजी लक्ष्मी पद्मावती लग्न सोहळा होनार आहे.
दि.१५ जुनं रोजी सायंकाळी ७.१५ वाजता श्री भगवान बालाजी व लक्ष्मी, पद्मावती ऊत्सव मुर्तीची भव्य मिरवणूक मंगलगिरी वाहनातून मंदिरापासून मी रोड डॉक्टर ड्रायव्हर यांच्या दवाखान्यापासून शिवमंदिर संभाजी चौक एनडी४१ मार्गे मंदिराकडे मिरवणुकी सोबत भजनी मंडळ महिला मंडळ पुरुष मंडळ भाविक भक्त सहभागी होणार आहे.
दिनांक 16 जून 2024 रोजी सकाळी महाभिषेक आरती तीर्थप्रसादाचा लाभ भक्त मंडळाचा भक्तमंडळाने घ्यावा नंतर होम हवन ब्राह्मण उत्सव पूर्णावती ब्राह्मण सन्मान महा आशीर्वाद सकाळी साडेअकरा ते दीड वाजता काल्याचे किर्तन हरिभक्त परमपूज्य अनिल महाराज माजलगावकर यांचे होईल काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद भंडारा होईल तरी सिडको हाडको नांदेड परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या मंगलमय भक्तीमय डोळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त मंडळ श्री भगवान बालाजी मंदिर सिडको नांदेड यांच्यामार्फत प्रसिद्धी देण्यात येत आहे