
0
3
2
1
9
0
जालना/प्रतिनिधी, दि.20
पवन उनवणे यांनी नुकत्याच झालेल्या सरल सेवा भरती कृषी विभाग संभाजीनगर या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कृषी विभाग संभाजीनगर मार्फत कृषीसेवक नियुक्ती कृषी विभाग घनसावंगी येथे रुजू झाला आहे.
पवन हा आदर्श विद्यालय सायगाव डोंगरगाव ता.बदनापूर जि.जालना येथिल मुख्याध्यापक पंढरीनाथ आश्रुबा उनावणे यांचा मुलगा आहे.या यशाबद्दल पवन चे सगळ्या स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. Live न्युज महाराष्ट्र चे संपादक भगवान धनगे यांनी पवन उनवणेचे या यशाबद्दल खास अभिनंदन केले आहे.
0
3
2
1
9
0