नेहरू युवा केंद्र, जालना, पार्थ सैनिकी स्कूल आणि युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पार्थ सैनिकी स्कूल, खरपुडी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील स्पर्धा हि प्रणित सांगवीकर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. मोहन नेहरे यांनी खेळाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक विकासही होतो. नियमित खेळल्याने शरीर सशक्त होते, तर मानसिक तणाव दूर होतो. तसेच, खेळातून शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात.”
स्पर्धेच्या वेळी कबड्डी (पुरुष), खो-खो (महिला), 100 मीटर धावणे (महिला व पुरुष) आणि गोळा फेक (महिला व पुरुष) या विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. खेळाडूंनी आत्मविश्वास, कौशल्य आणि जिद्दीचे दर्शन घडवत उत्कृष्ठ कामगिरी केली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक योगेश बावसकर, सत्येंद्र बिश्त, सतीश गाभूड, जयपाल राठोड, अशोक शिंदे, भैय्यासाहेब ढवळे, शिवराज जाधव यांनी मेहनत घेतली.