१४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यलयसमोर होणाऱ्या उपोषणास हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थांचा पाठिंबा नसल्याचे प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहिर.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10
१४ एप्रिल रोजी उरण तहसील कार्यलयसमोर होणाऱ्या उपोषणास हनुमान कोळीवाडा मधील ग्रामस्थांचा पाठिंबा नसल्याचे प्रसिद्धी पत्रका द्वारे जाहिर करण्यात आले असून त्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसन अपूर्ण आहे ते पूर्ण करावे ही मागणी सर्वांचीच आहे. परंतु ग्रामपंचायत बेकादेशीर आहे हे पूर्ण चुकीचे व हास्यस्पद आहे कारण गेल्या सहा पंचवार्षिक ग्रामपंचायत मतदान या ठिकाणी झालेले आहे. आणि ग्रामपंचायत मध्ये ज्यांनी अफरातफर गैरव्यवहार केले त्यांच्यावर त्या संदर्भात शासनाकडून गुन्हे नोंदवून वसुलीच्या केसेस न्यायप्रविष्ट आहेत अशाच लोकांनी हे उपोषण गावावर लादले आहे. याला आमचे गावकरी ग्रामस्थ या नात्याने समर्थन नाही.
ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठराव करून शासनाने गेली ३३ वर्ष गावाचा कारभार हा ग्रामपंचायत मार्फत चालवला जात असून गावातील विकासाच्या बरोबर नागरिकांना आवश्यक त्यां सर्व सुख सोयी प्रशासन व जेएनपीटी ही ग्रामपंचायतला पुरविल्या जात आहेत. ग्रामपंचायत ही गावच्या पुनर्वसना नंतर तत्कालीन गावच्या कार्यकर्त्यांनी दिनांक २०/०६/१९८६ रोजी शासनाकडे ठराव व विनंती करून स्वतंत्र ग्रामपंचायत मागणी नुसार सन १९८७ रोजी नवीन गावात स्वतंत्र गाव म्हणून हनुमान कोळीवाडा घोषित करून जुना शेवे कोळीवाडा या ग्रामपंचायतीचे विघटन करून पुनर्वसन अंतर्गत विशेष बाब म्हणून स्वतंत्र हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत शासन स्तरावर मंजूर करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत ज्या लोकांकडून ग्रामपंचायत बेकायदेशीर आहे अशी आवई ठरवली जात आहे ते लोक ज्यांना शासनाने मुदत संपण्यापूर्वीच अपात्र ठरवून सरपंच पदावरून हकालपट्टी / बडतर्फ केले व त्यांच्याशी संबंधित काही लोक यांच्याकडून सतत आपण केलेले गुन्हे माफ करण्यात यावेत तसेच सध्या ग्रामपंचायतवर प्रशासक असताना व शासनाच्या ६ डिसेंबर २००६ च्या शासन निर्णयानुसार पाणी कमिटी बरखास्त केलेल्या असताना बेकायदेशीर चालवली जात असलेली पाणी कमिटी शासनाने संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करून ग्रामपंचायत च्या ताब्यात देण्यासाठी कार्यवाही करावी. असे असताना पोलीस विभागाकडून पाणी कमिटी ताब्यात घेणे बाबत ग्रामपंचायत यांना पोलीस संरक्षण दिले जात असतानाही प्रशासक व प्रशासन पाणी कमिटी स्वतःहून आपल्याआधीन घेत नाही यासाठी आम्ही अशा प्रशासनाचा निषेध करतो. वेळ पडल्यास लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरती उतरू तसेच पाणी कमिटी चालवणाऱ्या काही महिलांच्या गटाकडून सतत सतत प्रशासनाला वेठीस धरून आंदोलन केले जात आहे त्यामुळे यांच्या अशा गैर कृत्यामुळे गावातील तरुण पिढीला पंचक्रोशीतील किंवा अन्य कंपन्यांमध्ये कोणतेही नोकरी दिली जात नाही तसेच गावाची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे. या आमरण उपोषणा मध्ये संपूर्ण गावाचा कोणताही उल्लेख संबंध नाही स्वार्थापोटी आणि प्रशासनाला गावातील नागरिकांना वेटीस धरून त्रास देऊन सदरच्या संघटना / कमिटी या वैयक्तिक आमरण उपोषण करीत आहेत यामध्ये गावाचा कोणताही संबंध नाही याकरिता अशा कमिट्या उपोषण करणार असतील तर याची संपूर्ण गाव म्हणून आम्ही गावाचे ग्रामस्थ म्हणून कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही त्यामुळे अशा काही लोकांमुळे गावातील ग्रामस्थ वेठीस धरले जात असून पाण्यासारख्या नागरी सुविधांपासून गावातील व गावा लगत असणाऱ्या ग्रामस्थांना वंचित ठेवले जात आहे.
हनुमान कोळीवाड्यातील कायमस्वरूपी शेतकरी प्रकल्पग्रस्त विस्थापित श्री. अनंत रामजीवन परदेशी यांचे भाऊ यांची १० कुटुंबे आणि ४२ सदस्य हे ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा येथील गेली ३२ वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून करधारक असून नियमित घरपट्टी पाणीपट्टी भरत आहेत लोकसभा विधानसभा यांना त्यांच्या कुटुंबाने मतदान करून हक्क बजावला या सूड भावनेने १ जानेवारी २०२५ पासून गेली ९० दिवस पाण्यापासून या गावातील बेकायदेशीर पाणीकमिटी ने पाणी सारख्या जीवनावश्यक गोष्टी पासून वंचित ठेवलेले आहे. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांना आमचा व १०० टक्के गावाचा पाठिंबा नाही. म्हणून १४ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या आंदोलनास (उपोषणास) आमचा ग्रामस्थांचा कोणताही पाठींबा नसून या संदर्भात कोणतीही जबाबदारी ग्रामस्थांवर न लादता अशी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था हातात घेऊन प्रशासनास वेठीस धरणाऱ्या व शांततापूर्ण वातावरण बिघडवणाऱ्या कमिटी समिती या लोकांनाच जबाबदार धरून यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी.असे प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात असेही म्हंटले आहे की १९ मे २०२३ रोजी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी राजीप अलिबाग यांनी सुद्धा या संदर्भात पोलीस संरक्षण देऊन ग्रामपंचायत चा कार्यभार चालवावा जेणेकरून तेथील नागरिकांना नागरि सुविधांपासून वंचित राहावे लागू नये असे स्पष्ट आदेश गट विकास अधिकारी पंचायत समिती उरण यांना दिले आहेत त्याच्या प्रति पोलीस आयुक्त नवी मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पनवेल वरिष्ठ पोलीस सागरी मोरा पोलीस ठाणे यांना देखील दिल्या आहेत.
महोदय या आंदोलनास आम्हा ग्रामस्थांचा शंभर टक्के कोणताही पाठिंबा नसून या संदर्भातील कोणतीही जबाबदारी हनुमान कोळीवाडा या गावावर न लादता संबंधित खोटे कृत्य करणाऱ्या कमिटी ज्यांनी पत्र दिलेले आहे अशा कायदा सुव्यवस्था हातात घेऊन प्रशासनास वेठीस धरणा-या अशा लोकांना कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. गेली कित्येक वर्ष गावामध्ये विकासाची कोणतीही कामे करण्यात आली नाहीत. याउलट शासनामार्फत येणारा गोरगरीब जनतेच्या कल्याणाकरता पंधरावा वित्त आयोगाचा निधी येण्यापासून या लोकांनी रोखून ठेवला आहे. ग्रामपंचायतचे कोणतेही सभा नाही. ठराव नाही याला जबाबदार कोण ? सध्या स्थितीमध्ये नुकसान भरपाई म्हणून मिळालेला पैसा हा किती काळ टिकेल यानंतर पुढचे काय यासाठी शासनासोबत असणं प्रशासनासोबत राहणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे.अशी माहिती कमलाकर ग. कोळी शाखा प्रमुख शिवसेना शाखा हनुमान कोळीवाडा, श्याम नामदेव कोळी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी हनुमान कोळीवाडा, गौरव पा. कोळी चेअरमन आई एकविरा मच्छीमार सोसायटी ह. कोळीवाडा,पांडुरंग ल. कोळी- माजी सरपंच,जयंत अ. कोळी- माजी सरपंच,ज.क कोळी- माजी सरपंच,जयश्री क. कोळी- माजी सरपंच, गौरव पा. कोळी -माजी सरपंच यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे दिली आहे. सदर विषया संदर्भात मा. जिल्हाधिकारी रायगड अलिबाग,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग,मा. पोलीस आयुक्त नवी मुंबई,मा. पोलीस आयुक्त परिमंडल-२ पनवेल,मा. सहाय्यक पोलीस आयुक्त न्हावा शेवा पोर्ट बंदर विभाग, मा. तहसीलदार उरण रायगड,मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण रायगड आदी ठिकाणी पत्रव्यवहार करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रका द्वारे संबंधित मान्यवरांनी दिली आहे.