दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलिकर व रेवा राठोडचा वाढदिवस उत्साहात साजरा

नांदेड/प्रतिनिधी, दि.15
मा. डाकोरेचा वाढदिवस साजरा करताना भर पावसाचे दिवस असताना सुद्धा सोळा ही तालुक्यातील दिव्यांग बांधव वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना शुभेच्छा देताना ईश्वर त्यांना उदंड आयुष्य धैर्य, शक्ती, बुद्धी, चातुर्य देऊन दिव्यांगाच्या चळवळीत साठी त्यांना शक्ती प्राप्त होओ, त्यांच्या कार्यास यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या.
दिव्यांगाना हक्क मिळावे म्हणून शासन प्रशासनाला रात्र दिवस जागे करून दिनदुबळ्याना न्याय मिळत असल्यामुळे दिव्यांगानी पावसाचा विचार न करता वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी डाकोरेच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करून त्यांचा वाढदिवस अति उत्साहाने साजरा करण्यात आला
या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती समितीचे तथा पोर्टलचे पत्रकार राहुल साळवे हे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले , जि.ऊप अध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार,आणि सोळा ही तालुक्याचे अध्यक्ष आणि शाखाप्रमुख असे अनेक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील व रेवा राठोड यांचा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाला उत्तर देताना डाकोरे म्हणाले की आज भर पावसाचे दिवस असताना तुम्ही आपल्या प्रेमामुळे सोळाही तालुक्यातून दिव्यांग वृद्ध निराधार आणि शकडोच्या संख्येने उपस्थित राहून माझा वाढदिवस साजरा केला तुमच्या ऋणात मी सदैव राहील मी आपल्या कार्यासाठी सतत संघर्षशिल राहील तसेच दिव्यांग वृध्द निराधार बांधवांच्या अनुदनात वाढ व्हावी म्हणून मुंबई मंत्रालय येथे दिनांक दहा जुलै 2024 रोजी मंत्रालय घेरावा आंदोलन आयोजित केलेला होता या आंदोलनासाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोर्चा जाण्यासाठी 250 दिव्यांगानी नाव नोंदणी केलेली होती पण अचानक नैसर्गिक कृपेमुळे मुंबईमध्ये रेड पावसामुळे रेड अलर्ट जाहीर झाला होता त्यानिमित्त मुंबईमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली व अ मुंबईकरांनी घराबाहेर घराबाहेर पडू नये असे शासनाने जाहीर केले होते.
त्यामुळे दिव्यांग बांधवांना मोर्चाला जाताना त्रास होऊ नये म्हणून मी डाकोरे सर्व दिव्यांगाना फोन द्वारे विनंती केली मुंबईमध्ये वातावरण जाण्यास योग्य नसल्यामुळे मोर्चाला कोणी जाऊ नये मोजकेच शिष्ट मंडळ मुंबई च्या मोर्चा जातील आपण कोणी जाऊ नये असे आव्हान करून सुद्धा माझ्या नांदेड जिल्ह्यातील 50 शूर पराक्रमी दिव्यांगानी
आपल्या संघटनेचे महाराष्ट्र सचिव मनोज कोटकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील पन्नास दिव्यागानी मंत्रालय घेरावा आंदोलनात सहभागी झाले.
दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले अशा सर्व शूरवीर पराक्रमी दिव्यांगांचे मी आभारी आहे .पण आंदोलन दरम्यान मंत्रालयातील मंत्री मोर्चासमोर न येता पोलीसामार्फत दिव्यांगणा अटक करून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणतीही तरतूद न केल्यामुळे येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ व दिव्यांग बेरोजगार कल्याण कृती समितीच्या वतीने अनेक प्रश्नांसाठी मोर्चाचे आयोजन मा.राहुल साळवे व चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नियोजन या बैठकीत सर्वानुमते ठराव पास करण्यात आला .तसेच येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग, संघटना एकत्रित दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी संघटितपणे कोणती भूमिका घ्यावी याबद्दल सर्वानुमते निवडणुकीत बहिष्कार,कि नोटा बटन,कि निवडणुकीत उमेदवार याबदल सर्व संघटनांचे अधिवेशन घेऊन संघटित करण्यासाठी सर्वानुमते ठरले. कारण संघटितपणे दिव्यांगाची एकजुट नसल्यामुळे निवडणुकीत कोणत्याही पक्षाने जाहिरनामात उलेख नाहि.व निवडणु गेलेले उमेदवार सुध्दा दिव्यांगाचा विचार करत नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगानी निवडणुकीत संघटित व्हावे असे आव्हान दिव्यांचा, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांनी केले.
या बैठकीत दिव्यांग, बेरोजगार कल्याणकृति समिती चे राहुल साळवे, वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,जि.अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,जि.उपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार,नामदेव बोडके, चांदराव चव्हाण, दादाराव कांबळे, सुकळकर रेवा राठोड,
हेमसिंग आडे,प्रल्हाद जगताप, शिवप्रसाद बोडके कावेरीबाई जगताप,रूसृतुम काळे,छायाबाई चौतमाल,सोनबा चौतमाल, चंद्रकांत जाधव, शेकडो दिव्यांचा ऊपस्थित होते.