रुई सह परिसरात राजे यशवंतराव होळकर जंयती साजरी

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.3
हदगांव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा सह परीसरात भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते लढ्यात इंग्रजांचा सलग अठरा वेळा पराभव करणारे या भारत भूमीचे स्वतंत्र अबाधित राहील यासाठी जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणारे चक्रवर्ती सम्राट राजे यशवंतराव होळकर महाराज यांची जंयतीनिमीत्य तिन डिसेबंर रोजी शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालयात ठिक ठिकाणी जंयती साजरी करण्यात आली.
रुई येथे सामाजिक कार्यकर्ते अवधूत चोंढेकर यांच्या पुढाकारातून अहिल्याबाई होळकर नगरात राजे यशवंतराव होळकर जंयती करण्यात आली.यावेळी यशवंत सैना तालुका अध्यक्ष गंगाधर मस्के , सेवानिवृत शिक्षक भाऊराव डोरले सर,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव मस्के पळसेकर, अवधूत चोंढेकर रुईकर, रामराव मस्के, सतीश वानखेडे,अमोल गदाल दत्ता भालके गजानन गुदाल ,शिवाजी गुदाल,माधव कहुळकर,नवनाथ कुहळकर,माधव गुदाल, वैभव कुहळकर तुकाराम कहुळकर , प्रविण गुदाल , चिंतामणी ढालके , सिंधु गुदाल ,विशाल भालके ,अनिकेत भालके , गणेश भालके , नामु कुदळकर ,बळी कुदळकर , बालाजी गुदाल, बबलू लकडे ,अनील कुदाल , सचिन भालके ,जगदीश कुदळकर, गणपत गुदाल, नंदेश भालके ,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मंडळी समाज बांधव उपस्थित होते.