महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षेचे रविवारी आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.1
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि.21 जुलै 2024 रोजी दोन सत्रात सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या वेळेत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2024 आयोजित करण्यात आली आहे. असे अपर जिल्हादंडाधिकारी सोहम वायाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षेसाठी जालना जिल्हा केंद्रावर एकुण 1 हजार 630 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला असून जिल्ह्यात एकुण 5 उपकेंद्राची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान विद्युत पुरवठा खंडीत करु नये यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे मस्तगड जालना येथील कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकुण 5 परीक्षा उपकेंद्रावर 1 हजार 630 उमेदवारांसाठी एकुण 5 उपकेंद्र प्रमुख, 24 पर्यवेक्षक, 78 समवेक्षक, 10 सहाय्यक, 5 केअर टेकर व 34 वर्ग चारचे कर्मचारी असे एकुण 156 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.