pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

विकसित भारत संकल्प यात्रा; 12 डिसेंबर रोजीचे यात्रेचे वेळापत्रक यात्रेच्या माध्यमातून योजनांचा लाभ घ्यावा

0 1 7 5 5 2

जालना/प्रतिनिधी, दि.11

केंद्र शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून  कृषी पर्यत विविध योजनाचा समावेश आहे.
दि. 12 डिसेंबर रोजी या गावात विकसित भारत संकल्प यात्रा – विकसित भारत संकल्प यात्रा मंगळवार, दि. 12 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील खापरखेडा, मंठा तालुक्यातील खोरवड, जालना तालुक्यातील पाचनवडगाव, जाफराबाद तालुक्यातील देऊळगाव उगले, परतुर तालुक्यातील वैजोडा, अंबड तालुक्यातील मार्डी व शिरढोणे, भोकरदन तालुक्यातील गोसेगाव , जालना तालुक्यातील हिवरा रोशनगाव, भोकरदन तालुक्यातील खंडाळा आणि मंठा तालुक्यातील उसवद, परतुर तालुक्यातील रोहिना खु. येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील.
या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. तसेच आदीवासी विभागासाठी विशेष योजना, स्कॉलरशिप योजना, वंदन योजना, उज्वला योजना, उजाला योजना अशा विविध विभागाच्या योजनाचा यात समावेश असणार आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनाचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 5 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे