तिवसा-नागपूर महामार्गावरील मोझरी गावाजवळट्रक-सुमोच्या धडकेत 14 ठार

मोर्शी/त्रिफुल ढेवले,दि.11
तिवसा- नागपूर महामार्गावर भरधाव ट्रक व टाटा सुमोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 14 जण जागीच ठार, तर दोन वर्षीय मुलासह दोघे गंभीर जखमी झाले. तिवसा-नागपूर महामार्गावरील मोझरी गावाजवळ बुधवारी दुपारी हा अपघात झाला.
वाशीम जिल्ह्यातील कारंजालाड येथील काही भाविक टाटा सुमोने नागपूर येथील ताजोद्दीन बाबा दर्ग्याच्या दर्शनासाठी गेले होते. परताना त्यांच्या गाडीला टोमॅटो वाहून नेणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात सुमोतील 14 जण जागीच ठार झाले, तर चालक व दोनवर्षीय बालक गंभीर जखमी झाले. दोन्ही वाहने एकमेकांत अडकल्याने मृतदेह काढताना अडचण येत होती. अपघातानंतर मार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने सात ते आठ किलोमीटरपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.