मौजे तांदूळवाडी येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा

जालना/प्रतिनिधी,दि.14
मौजे तांदूळवाडी ता. जि. जालना येथे माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार निधी अंतर्गत सी.सी. रोड च्या बांधकामासाठी ७ लक्ष्य रूपये निधी तांदुळवाडी गावासाठी मंजूर करण्यात आला होता यावेळी या रस्त्याचे उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हासरचिटणीस सिद्धिविनायकजी मुळे, तालुका अध्यक्ष वसंतराव शिंदे, संजय डोंगरे, करण निकाळजे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, विलास दत्तू कापसे, रुपेश रावसाहेब निकाळजे, निलेश कचरु ढीलपे, शुभम कडुबा निकाळजे, पवन बोर्डे, आबा कापसे दत्तू पाटील कापसे, सुधाकर खरात, सतीश केळकर, मुकेश चव्हाण, मधुकर निकालजे, कडुबा निकाळजे, सुनील कापसे, बबन बोर्डे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते, गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.