गोलापांगरी येथे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन मेळावा

गोलापांगरी/प्रतिनिधी, दि.31
गोलापांगरी शिक्षण प्रसारक मंडळ गोलापांगरी, अंतर्गत नेहरू विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गोलापांगरी, येथे आज
(दि.31) रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली
किशोरवयीन मुलींसाठी त्यांची शारीरिक वाढ, या वयात होणारे शारीरिक,मानसिक बदल लक्षात घेऊन त्यांना सकारात्मकतेने स्वीकारून वैयक्तिक आरोग्य जोपासणे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे या उद्देशाने मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला.
आपल्या मनोगतात डॉक्टर श्रीमती स्नेहल अंबडकर मॅडम आरोग्यवर्धिनी केंद्र गोलापांगरी येथील समुदाय आरोग्य अधिकारी यांनी मुलींना
मार्गदर्शन करताना मुलींनी वैयक्तिक स्वच्छता नीट जोपासल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहील असे त्या म्हणाल्या.
गोलापांगरी पंचक्रोशीतील प्रगतिशील महिला शेतकरी, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सौ. छायाताई मोरे यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षण व निर्भयतेचे धडे दिले. त्यासाठी कराटे प्रशिक्षण, पोषक बाग प्रशिक्षण मुलींना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
जीवनातील विविध प्रसंगातून त्यांनी हिम्मत अंगी बांणण्याचे आव्हान केले,याप्रसंगी स्वलिखित कविता सादर केली…
“” मायबाप माझे ईळा
कोयत्याची धार
शेतामध्ये राबती, कष्टकरीती फार
चुलीवाणी मायं माझी जळतच राहिली, बापनं ही जिंदगानी शेतातच वाहिली.
चिमुकलं पोरं त्यांच्या भुकेला आधार, मायबाप माझे ईळा कोयत्याची धार !! ”
यासारखी हृदय द्रावक कविता गाऊन त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली व विद्यार्थिनींना प्रेरित केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती अनिता कुलकर्णी मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थिनींना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती पाटील मॅडम यांनीही किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे हे आपल्या प्रास्ताविकाद्वारे स्पष्टीकरण केले तर,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस. एस. कुलकर्णी मॅडम यांनी करून किशोरवयीन मुलींसाठी योग्य वयात योग्य वेळी मार्गदर्शन किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
श्रीमती जिगे मॅडम यांनी आभार व्यक्त करताना आपल्या मनोगतात आलेल्या पाहुण्यांचे आभार मानले.