pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण नगरपालिकेत पाण्यासाठी नागरिकांचा आक्रोश.

जनतेच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी

0 3 2 1 8 7

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

उरण नगरपालिका हद्दीतील आनंद नगर परिसरात गेले महिनाभरापासून अपुरा पाणीपुरवठा नगरपालिके कडून होत आहे.दोन दोन तीन दिवस नगरपालिका कडून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत यासंदर्भात नगरपालिकेकडे नागरिकांनी लेखी व भेटी देऊन सांगितले आहे.तरीसुद्धा पाणीपुरवठा होताना दिसत नाही नगरपालिकेकडून या संदर्भात कोणतीही उपाययोजना होत नसल्याने शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस व लिबर्टी पार्क सोसायटीचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी शिष्टमंडळा समवेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांना निवेदन प्रस्तुत केले. यावेळी मुख्याधिकारी समीर जाधव यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत लवकरात लवकर पाणी सुरळीत होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत यावेळी पाणी विभागाच्या प्रमुख वंजारी मॅडम व संतोष कांबळे उपस्थित होते. आनंद नगरच्या पाण्याच्या पाईप गटारातून जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर पाण्याचे प्रेशर वाढवणे पाण्याचे टाइमिंग फिक्स करणे जोपर्यंत नगरपालिकेकडून पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करणे ज्या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईन लिकेज आहे ते शोधून लिकेज काढणे तसेच एमआयडीसी कडून उरण शहराला अतिरिक्त पाण्याचा साठा वाढवून घेणे या बाबी शहर चिटणीस शेखर पाटील यांनी मांडल्या.नगरपालिकेने या अगोदरच मंगळवार आणि शुक्रवार पाणीपुरवठा बंद केला असताना नागरिकांना उर्वरित दिवसात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे नगरपालिकेची कोट्यावधींची थकबाकी एमआयडीसी कडे असल्यामुळे एमआयडीसी नगरपालिकेला पाणीपुरवठा करत नाही असे समजते. या संदर्भात नागरिकांनी एमआयडीसीची असलेली थकबाकी नगरपालिकेने भरावी व नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली.त्याचबरोबर रांनसाई धरणाचा पाणीपुरवठा बरोबर हेटवणे धरणाचे पाणी नागरिकांसाठी घ्यावे अशा सूचना दिल्या. जर नागरिकांच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न सुटला नाही तर घटनेच्या अधिकारानुसार आम्हास धरणे आंदोलन मोर्चा या संविधानिक मार्गाचा अवलंब करावा लागेल. नगरपालिकेने लवकरात लवकर उरण शहराला सुरळीत पाणीपुरवठा करावा.असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस व लिबर्टी पार्कचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी केले आहे. यावेळी शिष्टमंडळासमवेत प्रभाकर तांडेल,बेचैन परदेशी,रोहन म्हात्रे, शरद ठाकुर,जेष्ठ पत्रकार घनश्याम कडू, रवी म्हात्रे आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे