निवडणूक आयोगाने दिव्यांग, वृध्दाना मतदान केंद्रावर जाने शक्य होत नसल्याने गृहमतदानाच्या सुविधेमुळे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी मतदानाचा हक्क बजावला

नांदेड/प्रतिनिधी,दि.23
मतदानापासुन एकहि मतदार वंचीत राहु नये व ज्या दिव्यांग वृध्दांना मतदार केंद्रात जाऊन लाईन मध्ये ऊभे राहाता येत नसल्यामुळे अनेक दिव्यांग, वृध्दांना मतदान करण्याची ईच्छा असल्यामुळे त्यांचे मुले त्यांना उचलुन आनुन मतदान करत होते तर अनेक मतदानापासून वंचित राहाण्याची वेळ होती.
हि बाब लक्षात घेऊन निवडणूक
आयोगातर्फे ज्या दिव्यांग,वृध्दांना मतदान केंद्रावर जाता येत नसेल अशा मतदारानी अर्ज १२ डि नंबरचा फार्म भरून नाव नोंदणी केली अशा दिव्यांग, वृध्दांना गृह मतदानाची मोहिम राबविण्यात आलि.
त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशाने नियुक्ती केलेल्या गृहमतदान पथकाने दि.२० एप्रिल २०२४ रोजी नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन मतदान केंद्र व संपूर्ण टिमने दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांचे मतदान घेऊन दिव्यांग मतदारांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
त्यावेळि दिव्यांगाचे अध्यक्ष यांनी प्रथमच दिव्यांगाचा हक्क प्रशासन व शासनाचे अभिनंदन केले.