किरकोळ वादातून टपरीचलकाला पत्नी व मुलीसमोरच संपवले; वाळूज परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत
छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.12
वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी येथे दि. ११ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास टपरी चालकाला किरकोळ वादातून चाकूने साफसफ वार करत खून केल्याची घटना घडली. रत्यावर पडलेला रक्ताचे थारोळे बघून नागरिकही भयभीत झाले. या घटनेत सुनील राठोड वय ४२ रा. रांजणगाव शेपू, यांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरातील रांजणगाव शेणपुंजी येथील संत शिरोमणी सावता महाराज कमानीलगत सुनील राठोड यांची पानटपरी आहे, रात्री ९:३० वाजेच्या सुमारास आरोपी शिवा दुधमोगरे, पवन दुधमोगरे या दोन्ही भावंडांनी टपरीचालक सुनील राठोड सोबत पैसे न देण्यावरून वाद घातला. राठोड यांनी त्यांच्या पत्नी व मुलीला फोनवर माहिती देऊन बोलवून घेतले. थोड्या वेळानंतर आरोपी पुन्हा वाद घातला दोन्ही भावंडांनी वादाचे रुपांतर हाणामारीत झाले व यात राठोडवर चाकूने साफासफ वार करण्यात आले, रत्यावरच झालेल्या या प्रकारामुळे नागरिकही भयभीत झाले. रत्यावर #रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राठोडला दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पसार झालेल्या दोन्ही आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, यांचासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ट पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, कामटे, प्रविण पथरकर यांचासह ठशे तज्ज्ञ एम, स्वान पथक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कारवाई केली.
आरोपी सराईत गुन्हेगार
या खुनातील आरोपींवर या अगोदरही गंभीर गुन्हे दाखल आहे,परिसरात त्यांची दहशद होती. रांजणगाव शेणापूंजी येथे वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत आहे. त्यामुळे प्रलंबित असलेले रांजणगाव शेणपुंजी येथील स्वतंत्र पोलीस चौकी लवकर सुरु करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.