खोपटे गावात श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
हिंदूचे आराध्य दैवत भगवान श्रीराम देवतेचे २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्यामध्ये मूर्तीचे प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सोहळा देशभरात सर्वत्र साजरा करण्याचे आवाहन केले आहे.त्या अनुषंगाने देशात सर्वत्र वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत या सोहळ्याचे औचित्य साधून उरण तालुक्यातील खोपटे गावातील स्व कै.राम नारायण ठाकुर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन श्री प्रशांत भाउ मित्र परीवारा तर्फे खोपटे बांधपाडा डी.पी जवळ श्री राम मंदिर तिर्थक्षेत्र अयोध्या श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दि २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा. प्रभू श्रीराम मूर्ती अभिषेक,दुपारी १२ वा.चित्रकला स्पर्धा, दुपारी २ वा. खेळ पैठणीचा, सायं ५ वाजता खोपटे गावातील दिव्यांग व्यक्तींना भेटवस्तू वाटप, सायंकाळी ६ वाजता खोपटे गावातील कला क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा मान सन्मान असे विविध उपक्रम श्री प्रशांत भाउ मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे. तरी भाविक भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री प्रशांत भाऊ मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.