महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उबाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदे गटात पक्ष प्रवेश.
शिवसेना उबाटा गटाला उरण मध्ये खिंडार

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8
उरण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे उरण तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या कार्याची घोडदौड सुरूच असून महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मध्ये पक्षाचा प्रचार व प्रसार मोठया प्रमाणात सुरूच आहे.विविध उपक्रमही पक्षाच्या वतीने राबविले जात आहे. त्यामुळे अनेक तरुण, नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर हे शिवसेना शिंदे गटाच्या कार्य व विचाराने प्रेरित झाले आहेत. आकर्षित झाले आहेत. त्याच्याच प्रत्यय महेंद्र पाटील यांनी घडवून आणलेल्या पक्ष प्रवेशाने झाला आहे.
उरण तालुक्यातील खोपटा येथील शिवसेना उबाठा गटाचे शाखाप्रमुख हेमंत पाटील तसेच त्यांच्यासोबत उबाठा गटाचे कार्यकर्ते दत्तात्रेय पाटील, दिनेश पाटील, दत्ताराम पाटील, जितेंद्र पाटील, धीरज पाटील, किरण पाटील, राजेश मुंबईकर, अमर शिंदे यांनी शिवसेना तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , आमदार महेंद्र थोरवे आणि जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब भवन कर्जत, जिल्हा रायगड येथे पक्ष प्रवेश केला.यावेळी शिवसेनेचे अनिकेत पाटील आवरा पंचायत समिती विभाग प्रमुख, विकास पाटील, वेशवी शाखा प्रमुख रोहन पाटील, सुनील घरत,चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.तरुणांचा कल शिवसेना शिंदे गटाकडे वाढत चालला असून अजून मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश घडवून आणणार असल्याचे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उरण तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांनी सांगितले.