pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट.

0 3 2 1 8 1

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.19

बौद्ध विद्यार्थिनी यशश्री शिंदे या युवतीची निर्घून हत्या झाल्याची मानवतेला कलंक लावणारी घटना उरण मध्ये नुकतीच घडली. त्या दिवंगत यशश्री शिंदेंच्या घरी आज उरण मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी भेट देऊन शोकाकुल शिंदे कुटुंबियांची सांत्वन्पर भेट घेतली.

सामाजिक न्याय विभागातर्फे दिवंगत यशश्री शिंदे कुटुंबीयांना आठ लाख २५ हजाराची सांत्वनपर मदत आणि रिपब्लिकन पक्षातर्फे एक लाखाची मदत लवकरच देण्याचे आश्वासन ना .रामदास आठवले यांनी दिले.

“दिवंगत यशश्री शिंदे यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी. विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची सूचना ” ना.रामदास आठवले यांनी केली.दिवंगत यशश्री शिंदे यांचे वडील कंत्राटी कामगार असून तिला दोन बहिणी आहेत. त्यातील मोठ्या बहिणीला समाज कल्याण विभागा तर्फे तातडीने चांगली नोकरी मिळवून देण्याची सूचना ना. रामदास आठवले यांनी रायगड जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

यशश्री शिंदे यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.
महिला अत्याचार बलात्कार आणि हत्या रोखण्यासाठी सरकार ने शक्ती कायदा करून फाशीची शिक्षा करण्याचा कठोर कायदा केला आहे तरी असे निर्घृण प्रकार घडत आहेत. फाशीची शिक्षा असणारा कठोर कायदा असताना लव्ह जिहाद साठी नवीन कायद्याची गरज नाही आणि लव्ह जिहाद हा प्रकार आपण मानत नाही असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले. दिवंगत यशश्री शिंदे यांच्या कुटुंबियांची अनेक राजकीय नेत्यांनी मंत्र्यांनी भेट घेतली, मात्र राज्य सरकार तर्फे किंवा कोणत्याही नेत्या तर्फे आम्हाला सांत्वानपर आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंत दिवंगत यशश्री शिंदे यांच्या वडिलांनी व्यक्त केली.समाज कल्याण विभागतर्फे तातडीने ८ लाख २५ हजाराची सांत्वनपर मदत देण्याचे निर्देश ना. रामदास आठवले यांनी समाज कल्याण अधिकाऱ्यांना दिले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड,मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रमोद महाडिक,राहुल डाळिंबकर,
प्रभाकर कांबळे, उरण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड,
डॉ प्रकाश शेंडगे, प्रकाश कमलाकर जाधव, सुमित मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे