राष्ट्र्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न

जालना/प्रतिनिधी,दि.13
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जीवनराव पारे विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमास माधव बद्रे, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, रेखा परदेशी, विजय गाडेकर, राहुल गायके, हारुण शेर खान हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कु. वैष्णवी खडके, ख़ुशी कुऱ्हे, कु. समिक्षा रत्नपारखे, कु. प्राजक्ता माने यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कु राणी दणके, दिव्या सरोदे, प्रतीक वाघमारे, दिव्या खांडेभराड, दिव्या वांगे, दिव्या कऱ्हाळे, भक्ती दैने, अंजली आदमाने, पल्लवी आदमाने, प्रीती शिंदे, शिल्पा खरात, दिव्या पिंपळे या विद्यार्थ्यांनी समयोचित भाषणे केली तर क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे यांनी आपल्या भाषणातून स्वामी विवेकानंद यांची यथोगाथा सांगितली.