वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

जालना/प्रतिनिधी, दि.3
अंबड तालूक्यातील वडीगोद्री येथील नैराश्यग्रस्त शेतकरी पृथ्वीराज बबन काळे (वय 43) यांनी 7 ऑक्टोबर, 2023 रोजी आत्महत्या केली होती. या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांनी आज सांत्वनपर भेट घेतली. या पीडित परिवाराच्या समस्या जाणून घेत त्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारी सर्व मदत करण्याची ग्वाही दिली.
शेतकऱ्यांनी आलेल्या परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे परिवाराची होणारी आबाळ लक्षात घेऊन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर उभे राहण्याची गरज आहे. शासन व प्रशासन शेतकरी बांधवाच्या पाठीशी सदैव ठाम असल्याचे ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह काळे परिवारातील सदस्य व गावकरी उपस्थित होते.