pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

CSMSS छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या १६६ विद्यार्थ्यांची विविधय कंपन्यांमध्ये निवड

0 3 2 1 7 3

भोकरदन/संजीव पाटील,दि.10

कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधील २०२४-२५ मध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध कंपन्याचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन वर्षभरामध्ये करण्यात आले होते. त्यामध्ये अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या १६६ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली असून त्यांना रुपये १.२० ते ११.७५ लाखांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मेकँनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रोनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची निवड झालेल्या कंपन्यामध्ये, जनरल मोटर्स, एथर एनर्जी, प्रोबियॉन टेक प्रा. ली., काँटॅमसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, लिभेर अप्लायन्सेस, ग्राइंड मास्टर, जीटीएल सॉफ्टवेअर, इन्फीसोल एनर्जी, वेबसम सॉफ्टवेअर प्रा. लि., जिओस्पेक्ट्रा जिओटेक, मेटा रोल्स, सुमागो इन्फोटेक, पर्किन्स इंडिया, टूल टेक टुलिंग्स, फ्लायनट सास प्रा. लि. आदी कंपन्यांचा समावेश आहे.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच या महाविद्यालयातील तसेच मराठवाडा विभागातील विद्यार्थ्यांना नौकरीच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असून त्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळेचे तसेच कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात येते. तसेच महाविद्यालयामध्ये टेक्निकल ट्रैनिंग, प्रोग्रामिंग लँग्वेज, SAP, सोबतच सॉफ्ट स्किल, Aptitude skill ट्रैनिंग, मॉक इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. महाविद्यालयात असणाऱ्या ई – वेहिकल सेंटर, बहा ऑफ रोड वेहिकल सेंटरमध्ये चार चाकी वाहन बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे .
या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष इंजि. रणजीत मुळे, सचिव श्री. पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, उपप्राचार्य
डॉ. देवेंद्र भुयार, डॉ. संदीप अभंग, प्रा. संजय कुलकर्णी, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. मनोज मते, प्रा. रमण करडे, प्रा. अजय बुटवानी आणि सर्व विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे