उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका रस्त्यावर पथदिवे लावण्याची त्रस्त नागरिकांची प्रशासनास मागणी.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28
१२ जानेवारी २०२४ रोजी उरण रेल्वे स्टेशनचे उदघाटन मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे उरणच्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रोज रेल्वे प्रवास करणाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक , दिव्यांग यांचा मोठा सहभाग आहे.
परंतू मध्ये उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाकापर्यंत रोडवर पथदिवे नसल्याने संध्याकाळ नंतर पूर्णतः अंधार पसरला जातो. त्यामुळे शाळा- कॉलेज विध्यार्थी, महिला, दिव्यांग, जेष्ठ नागरिक या सर्वांना समोरून व पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे आपला जीव मुठीत घेऊन, अंधारातून पायपीट करावी लागते.
तसेच मुख्यतः अंधारातून पायपीट करत असताना विद्यार्थी, महिला व जेष्ठ नागरीक यांच्या वर अंधाराचा फायदा घेऊन लुटमार, चोरी, छेडछाड असे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका मुख्यरोड वर लवकरात लवकर ग्रुप-ग्राम पंचायत चाणजे व प्रशासन मार्फत पथदिवे बसविण्याची मागणी त्रस्त रेल्वे प्रवाशी करीत आहेत.