प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित केले होते आयोजन

पुणे/प्रतिनिधी, दि.15
पुणे, पिंपरी चिंचवड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या माध्यमातून पत्रकारितेसह सामाजिक जाणिवेचे भान ठेवून अनेक उपक्रम राबवत असतात. त्याचाच एक भाग म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांनी संघाचे आभार मानून आशीर्वाद दिले. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणि समाधान दिसून आलं. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवडच्या वतीने पिंपरी येथील आंबेडकर पुतळा चौक येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ पुणे पिंपरी चिंचवडच्या महिला शहराध्यक्षा व सा. पालिका संदेशच्या संपादिका सौ मंदा संजय बनसोडे, पिंपरी चिंचवड उपाध्यक्षा सा. वंचित विचारच्या संपादिका सौ उषा लोखंडे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव, भारतरत्न, बोधिसत्व, आधुनिक भारताचा पाया रचणारे ज्ञानाचा अथांग महासागर, डॉ. बासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३३ व्या जयंती निमीत्त अभिवादन करण्यासाठी पिंपरी चौक येथे लाखोंच्या संख्येने लोक येतात. यावर्षीही प्रखर उन्हाची तमा न बाळगता हजारो अनुयायी यांची सकाळपासूनच उपस्थिती होती . त्यांनी देश व समाजाच्या विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं.
यावेळी तानुल्या मुलांसह महीला अबालवृद्ध, दिव्यांग बांधवांसह तरुणाईची मोठी उपस्थिती होती.
रखरखत्या उन्हात देखिल भीम अनुयायांची गर्दी वाढत होती, दुपारनंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत अनेक ठिकाणच्या मिरवणुकी डिजेच्या तालावर नाच गाण्यांसह भिमगितानी परीसर दुमदुमला होता.