महिला बचत गटास थकीत देयकासह यापुढे अडी अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल – डिप्टी सिईओ प्रशांत थोरात

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.27
नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागा अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडीतील आहार वाटपाचे काम करणा-महिला बचत गटाचे थकीत देयके दिवाळी अगोदर देण्यासह काही मागण्या सोडवण्यासाठी वीरशैव शिवा समाज संघटनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सविता निमडगे पळसेकर यांनी जिल्हा प्रशासनास लेखी निवेदनातून मागणी केली होती. त्याची दखल घेत नव्यानेच पदभार स्वीकारलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी जिल्ह्य़ातील संबधित सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी विस्तार अधिकारी यांची मिटींग घेत जिल्ह्यातील अंगणवाडीतील आहार वाटप काम करणा-या महिला बचत गटाचे थकीत देयके दिवाळी अगोदर मिळणे शक्य होणार नसले तरी लवकर मिळण्यास प्राधान्य देऊन यापुढील काळात बचत गटाचे बिल थकीत राहणार नाही यासाठी महिला बचत गटांकडुन प्रती महिना बिल सादर करून घेण्यासह थकीत देयके विविध अडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल असे सांगीतले.