काजळा येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ
सद्गुरु भडंगनाथ बाबा यांच्या पुण्यतिथी निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, संगित भावार्थ रामायण कथा

काजळा/प्रतिनिधी, दि 05
बदनापूर: सर्व धर्मानुरागी तथा भाविक जनतेस कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की, सध्याच्या अस्थिर युगामध्ये अधोगतीच्या मार्गाने वाढत जाणाऱ्या मानव जातीला स्थिरता प्राप्त होण्यासाठी संताच्या शिकवणुकिची नितांत गरज आहे. समाजात प्रेमववृद्धी, सहिष्णुता आणि सात्विकता वृद्धिगत व्हावी यासाठी श्रीक्षेत्र काजळा येथ श्री संत भगनाथ बाबा यांच्या पुण्यातिथी निमत्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज अखिल कोटी ब्रम्हांडनायक पांडुरंग परमात्माच्या कृपेने व श्री संत रघुनाथ बाबा, ज्ञानानंद बाबा, मारोती महाराज कुरेकर (बाबा), धर्मभुषण वै. गु. विष्णु म. कव्हळेकर, व वै.गु. नाना म. बुटेगांवकर यांच्या आशिर्वादाने व श्री. ह.भ.प. किसन म. जाधव यांच्या प्रेरणीने अखंड हरिनाम सप्ताह बदनापूर तालुक्यातील मौजे काजळा येथे आज दि.06.01.2025 ते दि.13.01.2025 पर्यंत संपन्न होत आहे. यंदा सप्ताहाचे 58 वर्ष आहे.
● कार्यक्रमाची रूपरेषा
दैनंदिन कार्यक्रमः – पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६.३० ते १०.३० विष्णुसहस्त्रनाम व ज्ञानेश्वरी पारायण, १०.३० ते १२ गाथा भजन, १२ ते २.३० नामचिंतण, २.३० ते ४.३० रामायण कथा, ४.३० ते ५ प्रवचण, ५ ते ६ हरीपाठ व रात्री ८.३० ते १०.३० हरिकिर्तन व नंतर जागर
● किर्तनसेवा
सोमवार,दि. 06.01.2025 रोजी ह.भ.प. गणेश महाराज जाधव आळंदी देवाची, मंगळवार दि. 07.01. 2025 रोजी ह.भ.प. प्रल्हाद महाराज घाडगे शास्त्री आळंदी देवाची, बुधवार दि. 08.01 2025 रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जाधव, कीर्तन केशरी आळंदी देवाची, गुरुवार दि. 09.01 2025 रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, बुलढाणा शुक्रवार दि.10.01.2025 रोजी ह.भ.प. प्रभाकर महाराज शास्त्री पावन धाम आश्रम, डोंगरगाव शनिवार दि. 11.1.2025 रोजी ह.भ. प. सोपान महाराज सानप हिंगोली, रविवार दि. 12.1. 2025 रोजी ह.भ.प. विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, सोमवार दि.13. 1. 2025 रोजी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे गेवराई यांचे सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल.तरी सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ व्यावा आणि तन-मन-धनाने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समिती व गावकऱ्यांनी केले आहे.