ब्रेकिंग
जिल्हाधिकारी कार्यालयात माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन सद्भावना दिनाची उपस्थितांना प्रतिज्ञा

0
3
2
1
7
3
जालना/प्रतिनिधी,दि. 18
माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, मनिषा दांडगे आदी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
0
3
2
1
7
3