ग्रुप ग्रामपंचायत जासई यांच्या वतीने ग्रामपंचायत जासई सभागृह मध्ये फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीर उत्साहात संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
ग्रुप ग्रामपंचायत जासई यांच्या वतीने ग्रामपंचायत जासई सभागृह मध्ये फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते .सदर लोकअदालत व कायदेविषयक शिबीर निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांचा उपस्थितीत पार पडले .या मध्ये जासई ग्रामपंचायत मधील नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या समस्यांचे निवारण करून घेतले. कायदेशीर बाबीवर निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये यांनी मार्गदर्शन केले व कायदेशीर प्रश्न मार्गी लावले.यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्रीकांत उपाध्ये,ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोष घरत,उपसरपंच श्रीमती माईताई पाटील ,उरण तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष व्ही .एल .पाटील ,उपध्यक्ष किशोर ठाकूर ,माजी सभापती उरण ऍड सागर कडू ,ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर ,ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सदस्य आदित्य घरत ,सुदर्शन पाटील ,प्रशांत म्हात्रे ,रामकिशोर ठाकूर ,विनायक पाटील,वीणा घरत ,सुलोचना घरत ,आश्र्विनि नाईक ,हर्षदा तांडेल ,श्रुष्टी म्हात्रे ,जयश्री घरत ,स्वप्नाली दामले ,प्रतिक्षा म्हात्रे व नागरिक उपस्थित होते .या कायदेविषयक शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.