संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व डॉ. मैड डेंटल केअर क्लिनीक सेंटरच्या वतीने मोफत दंत चिकित्सा शिबीर संपन्न..!!

जालना/प्रतिनिधी, दि.22
संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील श्री. मनोहर बाबा विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघ व डॉ. मैड डेंटल केअर क्लिनीक अँड इम्प्लांट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालक यांचे मोफत दंत चिकित्सा शिबीर संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायखिंडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहनराव करंजकर होते.
उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर योगासन प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना एक टुथब्रश, टुथपेस्ट,पेन आदी शैक्षणिक साहित्य वाटप डॉ. सागर मैड डेंटल क्लिनीक केअर यांचे वतीने करण्यात आले. यावेळी ग्राम पंचायत सायखिंडी याचे वतीने येणाऱ्या पाहुण्यांना वृक्षारोपणा साठी वृक्ष देण्यात आले.
सदर कार्यक्रमास एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत महाले, डॉ. मैड डेंटल केअर सेंटरचे संचालक डॉ. सागर मैड, व डॉ कांचन मैड, डॉ अस्मिता लांडगे, डॉ स्मिता तांबे, डॉ साई खळदकर,सिस्टर,अनिता, गायत्री,व कोल्हे बाबा सह इत्यादी स्टाफ तसेच श्री मनोहर दुध संस्थेचे चेअरमन मारुती दादा गांडोळे, उपसरपंच दिपक करंजकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन डॉ. सागर गांडोळे, श्री मनोहरदास बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव अँड गणपतराव गांडोळे, संचालक संजय खतोडे,माजी सरपंच नवनाथभाऊ शिंदे,माजी केंद्र प्रमुख शिवनाथ पारधी , सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पारधी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश बो-हाडे, सोसायटीचे माजी चेअरमन गोपीनाथ गांडोळे, अँड शिवाजीराव ताजनपूरे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम शिंदे,
बस्तीराम गांडोळे आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रसाद सुतार, कार्याध्यक्ष सुशांत सातपुते, सचिव संदीप सातपुते, सहसचिव राजु शेख, खजिनदार जिजाबा हासे, जनता ठाणेदार न्युज चे संपादक रामा लोखंडे, प्रजासत्ताक न्युजचे संपादक सलीम शेख, प्रतिनिधी हुषेन पटेल, पत्रकार संतोष डुबे, वसंत बंदावणे , रामचंद्र कपिले ,ओंकार संस्कर,न्युज सुपर वन चे दिनेश बांगर, पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार अँड संग्राम जोंधळे,आदी प्रतिनिधी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयराम खर्डे व गजानन गायकवाड यांनी केले.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .