pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पुण्यनगरीच्या ज्ञानाई महिला भजनी मंडळाच्या भजनाने अवघी “नांदुरा नगरी”दुमदुमली ;विविध ठिकाणी भजन व स्वागत

0 1 7 7 6 4

वृत्तसंकलनःआत्माराम ढेकळे,पुणे,दि.20

पुणेः- पिंपरी-चिंचवड येथील प्रसिध्द ‘ज्ञानाई महिला भजनी मंडळाच्या ‘ भजन कार्यक्रमाने अवघी ‘नांदुरा नगरी’दुमदुमली.विविध ठिकाणी सुमधुर भजनाच्या कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध झाले.भजनी मंडळाचे या नगरीत भव्य स्वागतही झाले.
स्त्रीशक्ती फाउंडेशन ,पुणे संचलित’ज्ञानाई महिला भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम नांदुरा,जि.बुलढाणा येथे विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.त्यामध्ये प्रामुख्याने ‘श्री तिरुपती बालाजी संस्थानास भेट देऊन १०५फुट उंच अशा भव्य ‘श्री हनुमान मुर्तीचे’प्रथमच दर्शन घेऊन सर्वांनी कौतुक केले.तसेच याप्रसंगी रिमोटच्या माध्यमातून उंच असलेल्या श्री हनुमान मुर्तीचा जलाभिषेक करण्यात आला.यानंतर श्री बालाजी मंदिराच्या सभागृहात या भजनी मंडळाने येथे तीन तास सुमधुर आवाजात अभंग,गीत,,गौळण ,पाळणा,आदी उत्साहाने सादर करुन भाविकांना मंत्रमुग्ध केले.तर गौळण सादर करतांना महिलांनी नृत्यही केले.या मंदिरात श्री बालाजीची आरतीही करण्यात आली.व महाप्रसादाचा लाभ सर्वांना मिळाला.संस्थानच्या वतीने श्री बालाजींची प्रतिमा संचालिका सौ.व श्री यांना देऊन सत्कार करण्यात आला.भजन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करतांना या भजनी मंडळाच्या संचालिका सौ.अर्चना सोनार यांनी भावनिक होऊन अशा पावनभुमीत भजन करण्याची सेवा मिळाल्याबद्दल सार्थकता झाली असल्याचे व्यक्त करुन आयोजकांचे मनस्वी आभार मानले.शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त करतांना येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अनंतराव उंबरकर यांनी भजनी मंडळाच्या कार्यक्रमास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याबद्दल यापुढेही नांदुरा नगरीत धार्मिक उत्सव आदी कार्यक्रमात या भजनी मंडळाच्या कार्यक्रमाचे नक्कीच आयोजन होईल.असे प्रतिपादन केले. संस्थानचे विश्वस्त/सचिव श्री नारायणा उरमी यांनीही समाधान व्यक्त करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.तर धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शालीग्राम हिंगणे यांनी या संस्थानची माहिती दिली व महिला भजनी मंडळाचे कौतुक करुन अभिनंदनपर स्वागत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अध्यात्मज्ञान प्रसारक आत्माराम ढेकळे यांनी केले.याप्रसंगी सेवाव्रती गणेशराव कोळासकर ,अरुण खुटाफळे आदी मान्यवर ,भाविकजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगरीत प्रामुख्याने भजनी मंडळाने येथील मोहनराव नारायणा नेत्रालय या प्रकल्पास भेट दिली तेथे जनसंपर्क अधिकारी मारोती देशमाने यांनी सविस्तर माहिती दिली.तसेच सद्गुरु संत नरहरीबाबा आश्रम येथेही भेट देऊन भजनसेवा केली.
——— *उंबरकर यांच्या निवासस्थानी भव्य स्वागत*
नांदुरा निवासी व प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती अनंतराव उंबरकर यांच्या निवासस्थानी या ज्ञानाई महिला भजनी मंडळाच्या महिलांचे पारंपारिक औक्षण करुन सर्वांचे कौंटबिक जिव्हाळ्याने सदिच्छा भेट देऊन उंबरकर परिवाराने स्वागत केले. या महिला मंडळाचे सौ.मीरा उंबरकर,सौ.संगिता उंबरकर,सौ.धनश्री सोनार आदींनी स्वागत केले.तर आत्माराम ढेकळे,प्रा.ईश्वर सोनार ,हेमंत जोशी ,शालीग्राम हिंगणे यांचे अनंतराव उंबरकर, पुरुषोत्तम उंबरकर,हर्षद सोनार आदींनी स्वागत केले.हे आगळे वेगळे भव्य स्वागत व कौटुंबिक जिव्हाळा पाहुन संचालिका सौ.अर्चना सोनार व महिला भारावुन गेल्या.यावेळी सौ.कोकिळाबाई उंबरकर व श्री.त्र्यंबकराव उंबरकर (श्री .अनंतराव उंबरकर यांचे आई वडील)यांचे आशिर्वाद संचालिका व महिलांनी घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे