अवैधरित्या असलेली पाईपलाईनची चौकशी करावी – राम चव्हाण.

जालना/जितेंद्र गाडेकर,दि.20
जालना – दरेगाव,सिरसवाडी पाझर तलावातून व तलावा शेजारील असलेल्या सरकारी जमिनीवर अधिकृतपणे विहिरी खोदून तेथून रेल्वे गेट दरेगाव ते दिनेगाव रेल्वे स्टेशन व रेल्वे पोल नंबर 170-8 ते 170-14 यामधील अंतरातून अंदाजे 50 ते 60 अवैध पाईपलाईन रेल्वे पटरी खालून जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते राम चव्हाण यांनी केला आहे.त्यांनी नुकतीच घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी जालना तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी,रेल्वे divistion nanden DRM NANDED यांना दिले व यावेळी ते म्हणाले की या अवैधरित्या असलेल्या पाईपलाईनची पाणीपुरवठा त्वरित थांबावा व सदरील प्रकरणाची चौकशी करावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते राम चव्हाण यांनी दिला.