शिक्षणासाठी बस पुरवा अन्यथा आंदोलन करू शिवसेना महिला आघाडी – वैशालिताई इंगोले यांचा इशारा

अकोला/प्रतिनिधी, दि.8
तेल्हारा आगार मध्ये काही दिवसांपूर्वी आगार प्रमुखांना बस थांब्या बाबतीत निवेदन देऊनही परिस्थिती जैसेथेच दिसून येत आहे, हकीकत अशी की तेल्हारा व जळगाव तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी संग्रामपूर येथे बस ने जातात काही विध्यार्थ्यांनि बस ची पासेस सुद्धा काढल्या आहेत तर काही दररोज नगदी स्वरूपात तिकीट काढून प्रवास करतात आणि शाळा,कॉलेज करतात संग्रामपूर गावाच्या बाहेर शासकीय आय टी आय अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर असून येथे कोणत्याही बसेस थांबत नाहीत त्यामुळे विध्यार्थ्यांना संग्रामपूर बस स्टँड पासून हे अंतर पाई चालत जाऊन कॉलेज करावे लागते त्यात तेल्हारा वरून प्रवास करणारे विध्यार्थी हे मनातरी, पंचगव्हान, दहिगाव येथून प्रवास करत संग्रामपूर ला येतात त्यांना सकाळीच निघावे लागते त्यामुळे ते उपाशीपोटी असतात आणि संग्रामपूर बस स्टँड पासून पुन्हा दोन किलोमीटर पाई चालत जाणे त्यांना शक्य होत नाही संग्रामपूर च्या बाहेर पूर्वी संत गुलाबबाबा विद्यालयाजवळ विनंतीवरून थांबा होता असे असतांनाही येथे आज रोजी बस थांबत नसल्याने हा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, या बाबतीत तेल्हारा आगार प्रमुख शर्मा याना निवेदन देऊन विनंती केली त्यानुसार त्यांनी सर्व चालक वाहक याना सूचित केले परंतु वरिष्ठांना न जुमाणणारे कर्मचारी हे प्रत्येक क्षेत्रात असतातच त्यातील काही तेल्हारा आगारात पण दिसून आले साहेबांच्या आदेशाला चालक वाहक जुमानत नसल्याने शेवटी विध्यार्थ्यांनि शिवसेना महिला आघाडी तेल्हारा शहर प्रमुख वैशालिताई इंगोले ह्यांना सोबत घेऊन आमदार डॉ संजयजी कुटे साहेबांना जळगाव येथे त्यांचे निवासस्थानी जाऊन पुन्हा निवेदन दिले त्यावर आमदार संजय कुटे यांनी तात्काळ जळगाव आणि तेल्हारा डी एम याना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून चांगलेच धारेवर धरले, जळगाव डी एम टाले यांनी आपल्या कडे बस कमी असल्याचे सांगितले असता आमदार साहेबांनी बस उपलब्ध करून देण्या बाबतीत पुढे पत्रव्यवहार करण्या बाबत त्यांच्या पि ए ला सांगितले तसेच आय टी आय जवळ प्रवाशी निवारा लवकरच देऊ असे विध्यार्थ्यांना आश्वासन दिले तसेच सर्व बसेस आय टी आय जवळ थांबतील आणि बसेस न थांबल्यास मला कॉल करा असे सांगितले त्यामुळे विध्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.सदर निवेदनावर वैशालिताई इंगोले शिवसेना महिला आघाडी तेल्हारा शहर प्रमुख व रोशनी इंगोले, अश्विनी सोनोने,वैष्णवी वाघ, स्वानंदी कुलकर्णी, उदय पलस्कर, नितीन गवारगुरु, अमर्दिप गवारगुरु, हरिओम मनतकार, सुपेश यादगिरे, अलोक कोकरे,प्रणय भटकर,शाम बाभूळकर, अंकुश वानखडे ह्या विध्यार्थ्यांच्या सह्या आहेत,