विरेगाव येथे “महसूल सप्ताह” साजरा तहसीलदार छाया पवार यांचे मार्गदर्शन

विरेगाव/गणेश शिंदे, दि. 2
जालना तालुक्यातील विरेगाव येथे
विरेगाव मंडळ व नेर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महसुल सप्ताह कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच वर्षा जाधव होत्या तर प्रमुख पाहुणे माननीय तहसीलदार छाया पवार होत्या. कार्यक्रमास दोन्ही महसूल मंडळातील लोकप्रतिनिधी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तलाठी मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन तलाठी राऊत यांनी केले. यावेळी मा.जि.प.सदस्य बाबुराव खरात व माधवराव टकले तसेच चितळी पुतळी चे सरपंच राजेंद्र वांजुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तहसीलदार छाया पवार यांनी शासकीय योजनेचा मागोवा घेत विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अनेक शेतकरी बांधवांनी हजेरी लावली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी राऊत यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन तलाठी हजारे यांनी केले. यावेळी दोन्ही महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी श्रीमती घोबले , कुलकर्णी उपस्थित होते. तसेच दोन्ही मंडळातील तलाठी चौरे मॅडम, तलाठी खरात, तलाठी हिवाळे, तलाठी बारवाल, तलाठी ढाकरे,विरेगाव च्या ग्रामसेवक श्रीमती साबळे , बागल सर, काळे सर इ.उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाठी श्रीमती लांडगे व श्रीमती शिंदे यांनी परिश्रम घेतले.