सिडको प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे साडेबारा टक्के भूखंड तातडीने वितरीत व्हावे – कामगार नेते महेंद्रशेठ घरत

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.21
सिडकोने १९८४ साली नवी मुंबई साठी उरण, पनवेल येथील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. परंतु आजपर्यंत काही शेतकऱ्यांना साडेबाराटक्के भूखंड मिळाले नाही.या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे साडेबारा टक्के भूखंड मिळावे तसेच गरजेपोटी प्रकल्पग्रस्तांनी गावठाण बाहेर बांधलेली घरे नियमित करण्यासाठी हजारो भूमिपुत्रांनी बेलापूर येथे महाधरणे आंदोलन केले. प्रकल्पग्रस्त महासंघाचे शिष्टमंडळाने सिडको सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप ढोळे यांना भेटून निवेदन दिले.
लोकनेते स्व.दि. बा. पाटील साहेबांनंतर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्र घरत यांनी महाधरणे आंदोलनात उपस्थितांना मार्गदर्शन केले. या महाधरणे आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, ऍड.दिलीप ठाकूर, सुधाकर पाटील, दिपक पाटील, संतोष केणे, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत, रवींद्र पाटील, सिमा घरत आदि नेते तसेच मोठ्या संखेने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.