“ओळख नव्या विकसित भारताची, नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची “
जालना/प्रतिनिधी,दि.10
परिवर्तन घडवा… लोकसंख्या घटवा…!
“ओळख नव्या विकसित भारताची,
नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची “
जागतिक लोकसंख्या दिन दर वर्षी 11 जुलै रोजी संपूर्ण विश्वात साजरा करण्यात येतो. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाल्याचे संयुक्त राष्ट्रीय कौन्सिलींग यांच्या निदर्शनास आले. प्रथम जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै 1989 रोजी साजरा झाला. तेव्हापासुन 11 जुलै रोजी जगतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानेही 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचे घोषवाक्य खालील प्रमाणे आहे.
“ओळख नव्या विकसित भारताची,
नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्याची “
जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक दाम्पत्याने कुंटूंब नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडणे आवश्यक आहे. लोकसंख्यावाढीमुळे विविध समस्याला तोंड द्यावे लागते, हे लक्षात येताच शासनाने पंचवार्षिक योजना सन 1951-52 मध्ये कुंटुब कल्याण कार्यक्रम अंर्तभुत करुन 1952 पासून राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंमलात आणला. आपणास ज्ञातचे असेल की, जगामध्ये सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून दुस-या क्रमांकावर चीन हा देश आहे.
लोकसंख्या वाढ हा खरोखर चिंतेचा विषय आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, गरीबी, अन्नधान्य तुटवडा, निरक्षरता, गर्दी, प्रदुषण, रुग्णालयांत रुग्णवाढ, शिक्षणाचा अभाव, वाढते शहरीकरणामुळे झाडे कमी, परिणामी पाऊस कमी त्यामुळे कोरडा दुष्काळाची वेळ निर्माण होते. नैतिकता व सामाजिकस्तर पातळी खाली जावुन गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होते. हे केवळ लोकसंख्या वाढीमुळे होत असेल तर यामध्ये चांगल्या दृष्टीकोनातुन परिवर्तन होणे आवश्यक आहे. म्हणूनच म्हणतात “लहान कुंटुंब, सुखी कुंटुंब.”
लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजना, उपक्रम राबविण्यांत येतात. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय कुंटुंब कल्याण कार्यक्रम होय. शासकीय रुग्णालयातुन कुंटुंब नियोजनाची माहिती व उपक्रमांबाबत सांगितले जाते. कुंटुंब कल्याण कार्यक्रमात दोन प्रकारच्या पध्दती आहेत एक कायमची नसबंदी शस्त्रक्रिया व दुसरा प्रकार तात्पुरती कुंटूंब नियोजन पध्दत. यामध्ये स्त्री, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते व तात्पुरती पध्दतीमध्ये गर्भनिरोधक गोळ्या, अंतरा इंजेक्शन, कॉपर-टी, निरोध इ. बाबत जनतेतः जागरुकता निर्माण केली जाते. ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रण वाढीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लहान कुंटुंबाच्या फायद्याबाबत जनजागृती, बालविवाह कायदयाची अंमलबजावणी, राष्ट्रीय कुंटूंब कल्याण कार्यक्रमाची माहिती, प्रत्येक कुंटुंबाने परिवार नियोजनाचा सल्ला घेऊन अंमलबजावणी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे. ” परिवर्तन घडवा, लोकसंख्या घटवा “
— डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना