श्री गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त 17 सप्टेंबरला वाहतुकीच्या मार्गात बदल
जालना/प्रतिनिधी,दि.13
श्रीगणेश उत्सवानिमित्त श्रीची स्थापना झालेली असून दि.17 सप्टेंबर 2024 रोजी श्री विसर्जन मिरवणूक जालना शहरात पारंपारिक मार्गाने काढण्यात येणार आहे. मिरवणूकीच्यावेळी मिरवणूकीस अडथळा निर्माण होवू नये, रस्ता मोकळा रहावा व रस्त्यावर वाहने उभी राहून मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरीता जालना शहरातील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहे.
पर्यायी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून टांगा स्थानक, सराफा बाजार, पाणीवेस, सुभाष चौक मार्गे जुना जालना मध्ये जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ओम हॉस्पिटल, मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन ग्लोबल गुरुकुल शाळा जवळुन बायपास रोडने अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बडीसडक मार्गे सदर बाजार, जवाहर बाग चौकी, रहेमान गंज मार्गे जुना मोंढा, बसस्थानकाकडे जाणारी वाहतुक ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जिजामाता प्रवेश द्वार, जेईएस कॉलेज, बाबुराव काळे चौक, रहेमान गंज मार्गे जाईल व येईल.
नवीन जालनामधील सदर बाजार परिसर, रहेमान गंज, मुर्गी तलाव परीसर जवाहर बाग चौकी परीसरातील मामा चौक व सुभाष चौक मार्गे जुना जालन्यात जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही जुना मोंढा कमान, दीपक वाईन शॉप, बसस्थानक, लक्कड कोट, शिशटेकडी मार्गे जाईल व येईल. बसस्थानकाकडून येणारी व सुभाष चौक, पाणीवेस मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही बसस्थानक, दीपक वाईन शॉप, जुना मोंढा कमान, मुर्गी तलाव, बाबुराव काळे चौक, जे.ई.एस. कॉलेज, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल. रेल्वे स्टेशनकडुन मंमादेवी मार्गे तसेच गांधी चमनवरुन मंमादेवी मार्गे नवीन जालनामध्ये जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही नुतन वसाहत, अंबड चौफुली मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. छत्रपती संभाजी नगरकडुन येणारी व जालना मोतीबाग मार्गे अंबड, रेवगाव, घनसावंगी, मंठा, सिंदखेडराजाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही ग्रेडर टी पाँईन्ट, राजुर चौफुली, नविन मोंढा, कन्हैया नगर मार्गे बायपास रोडने जाईल व येईल. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.