ब्रेकिंग
जालना येथे 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारीसाठी भरती मेळावा
0
3
2
1
8
6
जालना/प्रतिनिधी,दि.6
औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे आयटीआय उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थ्याकरिता सोमवार दि. 9 ऑक्टोबर 2023 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यात जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या भरती मेळाव्यात आयटीआय ऊत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घ्यावा. या भरती मेळाव्यासाठी उमेदवारांनी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट फोटो सोबत बाळगणे अनिवार्य आहे. असे जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार श्रीमती आर. एस. शेळके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0
3
2
1
8
6