किरीट पाटील यांची विजय हॅटट्रिक

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. च्या कामगारांची दि मिलर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबई ची २०२४-२०२९ या पंचवर्षीय निवडणूक सोमवार दि १२/०८/२०२४ रोजी संपन्न झाली.सदर निवडणुकीत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे किरीट प्रभाकर पाटील हे उमेदवार होते. तसेच भारत पेट्रोलियम कर्मचारी युनियनचे दीपक पाटील हे त्यांचे सहकारी उमेदवार होते. तर विरोधात पेट्रोलियम नवनिर्माण युनियनचे प्राण घरत, अपक्ष उमेदवार राजेंद्र काशिनाथ ठाकूर, धर्मेंद्र प्रभाकर म्हात्रे हे निवडणूकीच्या रिंगणात होते. सदर निवडणुकीत पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे जनरल सेक्रेटरी व उमेदवार किरीट प्रभाकर पाटील हे विजयी झाले तर त्यांचे सहकारी दीपक पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मत घेऊन विजयी झाले. किरीट पाटील हे सामाजिक कामगार व राजकीय क्रीडा क्षेत्रात सातत्याने काम करत असतात. त्यांचे सर्व कामगार वर्गाशी व सर्वांशी चांगले संबंध आहेत आणि अतिशय डॅशिंग नेतृत्व म्हणून ते सुपरिचित आहेत.किरीट पाटील हे काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने कामगार प्रश्न व राजकीय प्रश्नांवर वर लढत असतात.आणि त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून लागोपाठ तीन वेळा ही निवडणूक ते जिंकले आहेत.सदर संस्था ही मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी असून तिचा व्याप्ती पूर्ण महाराष्ट्र, गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. एकूण १७ संचालक आहेत. त्यातील किरीट पाटील यांची युनियन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे आठ सदस्य निवडून आले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व विविध मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिले आहेत.विविध सोशल मीडिया वरही त्यांचे अभिनंदन होत आहे.निवडणूक जिंकल्यानंतर किरीट पाटील यांनी त्यांचे गुरु महेंद्रशेठ घरत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.