महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
जालना/प्रतिनिधी,दि. 31
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे आणि प्रा.डॉ.निलिमा सरप (लखाडे) हे मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरीता दि.4 व 5 जून 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
कार्यक्रमानुसार रविवार दि.4 जुन 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता खाजगी वाहनाने जालना येथे आगमन व शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील. सोमवार दि.5 जून रोजी सकाळी 9 वाजता जालनाहुन घनसावंगीकडे रवाना, सकाळी 10ते 12 या वेळेत घनसावंगी येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 12 वाजता घनसावंगी येथून परतूरकडे प्रयाण, दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत परतुर येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 3 वाजता जाफराबादकडे प्रयाण, दुपारी 3 ते 4 या वेळेत जाफराबाद येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. तर सायंकाळी 4 वाजता औरंगाबादकडे प्रयाण करतील.