pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पत्रकारास शिवीगाळ धमकी देणार्‍या शिवाजी गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पोलीस अधिक्षकांना निवेदन

0 1 7 7 3 8

जालना/ प्रतिनिधी,दि.26

येथील दैनिक जगमित्रचे संपादक संतोष विष्णु भुतेकर यांना फोनवरुन रावसाहेब दानवे यांच्याबद्दल वृत्तपत्रात बातम्या का छापतो म्हणत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणार्‍या शिवाजी जगन्नाथ गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी केली आहे.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दैनिक  जगमित्र चे संपादक संतोष भुतेकर रा. हिवर्डी ह.मु. जालना यांना गुरुवार दि. 25/04/2024 रोजी शिवाजी जगन्नाथ गायकवाड या माणसाने फोन वर रावसाहेब दानवेबद्दल वृत्तपत्रात लिहतो म्हणत शिवराळ शिवीगाळ केली व तुझ्या घरी येऊन तुला पाहतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पत्रकाराला धमकी देणार्‍या शिवाजी जगन्नाथ गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करून संबंधीत पत्रकाराला व त्याच्या परिवाराला पोलीस सरंक्षण देण्यात यावे, नसता लोकशाही मार्गाने आचार संहितेचे पालन करून आम आदमी पक्षाच्या जालना तालुक्याच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.
निवेदनावर आपचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे, आर. आर. पाटोळे, भिमा शिंदे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 7 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे