शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला “आदर्श संस्था” पुरस्काराने सन्मानित .

जालना/प्रतिनिधी, दि.18
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील स्वर्गीय पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला आदर्श संस्थेचा पुरस्कार नुकताच निमगाव वाघा येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम संयोजक व स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै. नाना किसनराव डोंगरे, पोलीस निरीक्षक सौ. ज्योतीताई गडकरी, पोलीस निरीक्षक माधवराव लामखडे, उद्योजक व माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत पालवे, ज्येष्ठ साहित्यिक कवी बाळासाहेब शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, स्त्री रोग तज्ञ डॉ. सुलभा अमित पवार, जेष्ठ साहित्यीक सुभाष सोनवणे, बालशाहीर ओवी काळे, श्रीरामपूर येथील कवी आनंदा साळवे, कवी रज्याक शेख बाळासाहेब मतोडे, विजय भलसिंग यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी शिवस्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण संजय वाघमारे, संस्थेच्या सचिव सौ. रमाताई वाघमारे यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल त्यांच्या प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेने आतापर्यंत समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, संत गाडगेबाबा यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वाटचाल केली आहे. उपेक्षित घटकांना पुरस्कार देऊन त्यांना समाजात मानाचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व कार्याची दखल घेऊन निमगाव वाघा येथील संस्थेने आदर्श संस्थेचा पुरस्कार दिल्याने आमच्या कार्याला हत्तीचे बळ मिळालं आहे यापूढे अधिक जोमाने संस्थेच्या माध्यमातून काम करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेला आदर्श संस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण, अध्यक्ष संजय वाघमारे, सचिव सौ. रमाताई वाघमारे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाठ यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.