साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी मातंग समाजातील अर्जदारांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत

जालना/प्रतिनिधी,दि.8
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जालना जिल्हा कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता एनएसएफडीसी योजनेत सुविधा कर्ज योजना 55 प्रत्येकी 5 लाख रुपये तर महिला समृध्दी योजनेत 30 प्रत्येकी 1 लाख 40 हजार रुपयांचे उद्दीष्ट प्राप्त झालेले आहे. तरी जालना जिल्ह्यातील मातंग समाजातील इच्छुक अर्जदारांनी आपले कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही.एस.सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जालना जिल्ह्यातील मांग/ मातंग समाजातील अंतर्भाव असणाऱ्या 12 पोटजातीतील इच्छूक अर्जदाराचे वय 18 वर्ष पुर्ण व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 3 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन या योजनेत साधारणपणे समाविष्ट लघुव्यवसाय उदा. मोबाईल सर्व्हिसींग/रिपेअरींग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तुरिपेअरींग, (फ्रिज, एस.सी., टि.व्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डवेअर, ब्युटीपार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फुडप्राडक्टस/प्रोसेसिंग, किराणादुकान, जनरल / स्टेशनरी स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फेब्रीकेशन/ वेल्डींग, हार्डवेअर व सेनेटरीशॉप, प्रिंटींग, शिवनकला, झेरॉक्स/लॅमिनेशन, हॉटेल, केटरींग सर्व्हिसेस, मंडप डेकोरेशन, क्रिडा साहित्य/स्पोर्टशॉप, फास्टफुड सेंटर/ज्युससेंटर, क्लॉथ/ रेडिमेड गारमेंट शॉप, मोटार मॅकेनिक/रिपेअर, शेतीशी निगडीत पुरक/जोडव्यवसाय तसेच वाहन इत्यादी व्यवसायासाठी कर्जमागणी प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत.
ऑनलाईन कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज तीन फोटो, रेशनकार्ड (समोरचेपान व शेवटचेपान), आधारकार्ड (समोरील बाजु व पाठीमागील बाजु) मतदानकार्ड/ मोबाई नं., पॅनकार्ड, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन), व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाणची भाडेपावती, भाडे करारनामा किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8, लाईट बील व टॅक्स पावती सहप्रतिज्ञापत्र बॉन्डवरनोटरीसह), अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँकखात्याचा तपशिल सादर करावा (पासबुक झेरॉक्सप्रत), ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉपॲक्ट/उद्यम आधार परवाना, व्यवसाया सबंधीत तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभावाचा दाखला, शैक्षणिक दाखला, अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, अर्जदाराचे सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, वाहन खरेदीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स व आर. टी.ओ. कडील प्रवासी वाहतुक परवाना, प्रकल्प अहवाल आदि कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.
कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या सुचनेनूसार दि.12 फेब्रुवारी ते दि.20 मार्च 2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे व सादर केलेल्या कर्ज मागणी अर्जाची व त्या सोबत अपलोड केलेल्या संपूर्ण कागदपत्रांची तीन (3) प्रतीत (हार्डकॉपी), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जालना येथे दि. 22 मार्च 2024 पर्यत कार्यालयीन वेळेत त सादर करावीत.
सुविधा कर्ज योजना या योजनेचे कर्ज मागणी अर्ज स्त्री व पुरुष हे अपलोड करतील. महिला समृध्दी योजनेचे कर्ज मागणी अर्ज फक्त महिला अर्जदार अपलोड करतील. सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजने अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थीचे कर्ज प्रकरण लाभार्थी निवड समितीच्या मान्यतेने प्रादेशिक कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात येईल. सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजना पैकी अर्जदार एकाच योजनेचा कर्ज प्रस्ताव अपलोड करु शकतील. सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजना या दोन योजने अंतर्गत उद्दिष्टा पेक्षा जास्तीचे प्रकरणे प्राप्त झाल्यास शासन निर्णय क्रमांक दि. 16 जानेवारी 2019 नूसार लाभार्थीची निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.