संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 21 हजार लाभार्थ्यांना खात्यात थेट डी.बी.टी. मार्फत जमा होणार अनुदान

जालना/प्रतिनिधी,दि. 23
जालना शहर तालुक्यात संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्त वेतन योजना या लाभार्थ्यांना डी.बी.टी. मार्फत त्यांचे खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लिंक करावा. यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करण्या संदर्भात सूचना दिल्या असून संजय गांधी शहर तहसिल कार्यालय येथे समक्ष लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे जमा करुन घ्यावी.
निराधार व्यक्तींना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याअखेर ठराविक मानधन दिले जाते. यासाठी तहसिलदार यांच्यामार्फत यादी पाठवून त्यानुसार निधीचे वाटप केले जात होते. ती निधी बँकेकडून संबंधित लाभार्थींच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे या पुढे डी.बी.टी. मार्फत अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनाचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून बँक खात्याला आधार कार्ड, मोबाईल क्रमांक संलग्न करुन संकलित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळे जालना शहरातील लाभार्थ्यांनी विहीत मुदतीत आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. जे लाभार्थी सदर कागदपत्र या कार्यालयास सादर करणार नाही त्यांचा लाभ बंद झाल्यास त्यासाठी लाभार्थी स्वत: सर्वस्वी जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी. अशी माहिती तहसिलदार जालना छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.