pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

कला क्रीडा दूत फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत खेळाडुंच्या सत्काराचे आयोजन

0 1 7 9 4 5

जालना/प्रतिनीधी,दि.17

कला क्रीडा दूत फाऊंडेशन व माईलस्टोन प्रि स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक ऑलंम्पीक दिना निमीत्त दहावी व बारावी उत्तीर्ण खेळाडुंच्या सत्काराचे आयोजन दि. 24 जुन 2023 शनिवार रोजी सकाळी 11.30 वाजता माईलस्टोन प्रि स्कुल, अमर ऑप्टीकलच्यावर, रोहीला गल्ली कॉर्नर, कचेरी रोड जुना जालना या ठिकाणी करण्यात आले आहे.
पात्र विद्यार्थी खेळाडु यांना आकर्षक टि शर्ट, प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल. विद्यार्थी खेळाडु कमीत कमी राज्यस्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेला असावा तसेच दहावी किंवा बारावी परीक्षेत 60 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारा असावा. विद्यार्थी खेळाडु याच वर्षी म्हणजेच 2022-23 या शैक्षणीक वर्षातीलच असावा तसेच तो जालना जिल्ह्याचा रहीवासी असावा.
पात्र विद्यार्थी खेळाडु यांनी प्रमाणपत्राची सत्यप्रत, मार्क मेमोची सत्यप्रत तसेच एक पासपोर्ट साईझ फोटो, टि शर्टची साईझ 9822456366 किंवा 9145649381, 9823392804 या नंबरवर व्हाटस अप करावे. अधिक माहितीसाठी 9822456366 या नंबरवर संपर्क साधावा.
तरी पात्र विद्यार्थी खेळाडु यांनी या सुवर्ण संधीचा लाभ असे आवाहन आयोजन समीतीचे अध्यक्ष शेख अहेमद, सचिन आर्य, विजय गाढेकर, संतोष वाघ, नितीन जाधव, युवराज गाढेकर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 9 4 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे