आम आदमी पार्टी हदगाव तर्फे अजित खोत यांचा सत्कार

हदगाव/प्रतिनिधी,दि.18
काल नांदेड येथे आम आदमी मराठवाडा संपर्क प्रमुख मा ऍड अजित खोत यांनी आढावा बैठकीचे हॉटेल ताज पाटील येथे आयोजन केले होते यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हासंयोजक मा ज्ञानेश्वर कदम पाटील पांगरिकर ,तसेच महानगरपालिका संयोजक मा प्रा देविदास शिंदे , संघटनमंत्री मोहनराव शिरसाठ , जिल्हा युवासंयोजक आदिल जहागीरदार , जिल्हा सचिव डॉ अवधूत पवार , पंकज कद्रेकर किनवट चे चाटसे सर व राठोड साहेब ऍड जगजीवन भेदे , , मा दिलीप दादा जोंधळे , सर्व तालुक्याच्या कार्यकारन्यातील पदाधिकारी , जिल्हाटीम , विविध आघाड्यांचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थित हदगाव तालुका शाखेच्या वतीने मा ऍड अजित खोत यांचा भव्य सत्कार महिला जिल्हा संयोजक मा रुपादेवी पाटील जिल्हा सहसंयोजक गौरी काळे , सदस्य , सुभद्रा खंदारे , कार्याध्यक्ष ऍड रविकुमार सुर्यवंशी , सहसंयोजक मा बापूराव कदम , जिल्हा सदस्य सुदामदादा पाईकराव , तालुका सचिव प्रा .शिवाजी जोजार , रुद्राक्ष गंगासागर , संयोजक नागोराव गंगासागर यांनी केला .