आपटा सारसई येथील धनगरवाडा, गोविंदावाडी , खकडकीचीवाडी, टपोरावाडीवरील आदिवासीं बांधवांना फ्रेश फ्रूटज्यूस, फ्रुटी, डाबर नीम टूथपेस्ट,तेल आणि वेदिक चहापावडरचे केलं वाटप !

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.6
खरं तर अनेक सुख – सोयींचा वानवा असणाऱ्या दुर – दुर्गम,डोंगर दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी समाजात अशी अनेकव्यक्तिमत्व आहेत ,अनेक सामाजिक संस्था आहेत जे सामाजिक दायित्व जपत आपलं अमूल्य योगदान देत असतात त्यातलीच काही मोजकीच व्यक्तिमत्व आणि सामाजिक संस्था ज्यांच्या माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्य साकारली त्यातलीच काही मोजकी नावं म्हणजे केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था आणि संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर त्याच सोबत डाबर इंडिया कंपनी आणि कंपनीचे महेशजी पवार त्याच बरोबर श्री समर्थकृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था व संस्थेच्या अध्यक्षा संगिताताई ढेरे या सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एक आदर्शवत कार्य साकारलं गेलं ते म्हणजे आपटा सारसई विभागातील धनगरवाडा,गोविंदावाडी, खकडकीचीवाडी आणि टपोरावाडी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासीं बांधवांना डाबर इंडिया या नामांकित कंपनीचे रिअल फ्रेश फ्रूट ज्यूस,ऑरेंज फ्रुटी, डाबर निम टूथपेस्ट, मस्टर्ड ऑईल, ऍपलव्हिनेगर,वेदिक चहापावडर,खोबरेल तेल या वस्तूंचे वाटप करण्यात आले.या जीवनावश्यक वस्तूंच्या वाटप करताना तिथे मोठ्या संख्येत उपस्थित असणाऱ्या आदिवासीं महिला भगिनीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहण्या जोगा होता.
कार्यक्रमा प्रसंगी सारसई विभागातील आदिवासीं समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा यांच्या आयोजनातून धनगरवाडा येथे उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे घोंगडी,टोप,पुष्पगुच्छ आणि स्वागत गीताच्या माध्यमातून पारंपरिक धनगर पद्धतीने केलेलं जंगी स्वागत अगदी मान भारावून टाकणारं होते.
केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर, राणीताई मुंबईकर, श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा संगिताताई ढेरे,वेश्वि गावचे सामाजिक कार्यकर्ते विनोददादा पाटील,सुरेंद्रदादा पाटील( कॉन वेश्वि उपशाखा अध्यक्ष), अनिल घरत ( उरण तालुका सचिव – आगरी, कोळी कराडी, संघर्ष सामाजिक संस्था), सारसई विभागातील आदिवासी समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोषदादा शिंघाडे,आपटा सारसई ग्रामपंचायत सदस्या मनिषाताई वाघे आणि सोबतच धनगरवाडा गोविंदावाडी या आदिवासीं वाडीवरील आदिवासीं बांधव आणि महिलांभगिनींच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.