तोष्णीवाल महाविद्यालयातील कबड्डी संघाचे यश

हिंगोली/प्रतिनिधी, दि.25
शालेय क्रीडा युवक संचनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय,हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आश्रम शाळा, बाभूळगाव येथे झालेल्या सेनगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १९ वर्ष मुले वयोगटात तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सदर विजयी संघातील वरून कोरडे, आदित्य तायडे,रितेश खताळ, संजय गरपाळ, धर्मदीप गरपाळ, ज्ञानेश्वर डाळ, रोहित कांबळे, नागेश ढोकर,पृथ्वी डोंगरे,राम काळे,गोपाळ नागरे, विवेक देशमुख यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांच्या सदर यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री.बी. आर. तोष्णीवाल,सचिव श्री. यु.एम. शेळके, उपाध्यक्ष श्री.सुभाषअप्पा एकशिंगे, महाविद्यालयीन विकास समिती अध्यक्ष श्री. रमण तोष्णीवाल, प्राचार्य डॉ.एस.जी.तळणीकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विजयी खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा.हेमंत शिंदे,प्रा.एस.जे. चाटसे यांनी मार्गदर्शन केले.